राज्यातील काँग्रेसचा आणखी एक बडा नेता भाजपच्या संपर्कात, दोन दिवसात पक्ष सोडणार?

राज्यातील काँग्रेसचा आणखी एक बडा नेता भाजपच्या संपर्कात, दोन दिवसात पक्ष सोडणार?

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरु आहे. अनेक बडे नेते या पक्षातून त्या पक्षात उड्या घेत आहेत. सातारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर आणखी एक काँग्रेस नेता भाजपात जाण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील ५२ गावावर प्रभाव असलेले सोलापूर जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष कल्याण काळे भाजप संपर्कात असल्याची माहिती आहे.

दरम्यान दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी, शेकाप , काँग्रेसची जिल्ह्यात नियोजन बैठक पार पडली. या बैठकीसही कल्याण काळे अनुपस्थित होते. तसेच ते दोन दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कल्याण काळे लवकरच भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. कल्याण काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर या मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS