काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर, ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक?

काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर, ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील गळती अजूनही सुरु आहे. काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशातच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सत्यजित देशमुख यांच्याशी बोलणी सुरू असून त्यांना भाजपकडून शिराळा विधानसभा मतदारसंघातून लढवले जाणार असल्याची माहिती आहे. शिराळातील विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांना विधानपरिषद देण्यात येणार असून त्यांच्याठिकाणी देशमुख यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान सत्यजित देशमुख हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आहेत.त्यांनी काँग्रेसकडून मंत्रिपदही भूषवलं होतं. सांगलीत त्यांना मानणारा मोठा वर्ग असून काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे आपल्या कारकिर्दीला फटका बसत असल्याची खंत, काही दिवसांपूर्वी त्यांनी व्यक्त केली होती. देशमुख यांनी जर भाजपात प्रवेश केला तर त्यांच्या रुपाने सांगलीत काँग्रेसला मोठा फटका बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS