काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार शिवसेनेच्या वाटेवर!

काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार शिवसेनेच्या वाटेवर!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण दक्षिण सोलापूरमधील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे शिवसेनेत जाणार असल्याचे संकेत वर्तवले जात आहेत. याबाबत माने हे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन विचार विनिमय करत आहेत. आज दक्षिण सोलापूरमध्ये माने यांची कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. माने जर शिवसेनेत गेले तर आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला दक्षिण सोलापूरसह मोहोळ मतदारसंघात फायदा होणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये जोरदार पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आता दक्षिण सोलापूरमधील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे शिवसेनेत जाणार असल्याचे संकेत वर्तवले जात आहेत. त्यामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS