काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याने दिले भाजपमध्ये जाण्याचे संकेत !

काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याने दिले भाजपमध्ये जाण्याचे संकेत !

सातारा – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील आणखी एक ज्येष्ठ नेता भाजपमध्ये जाणार असल्याचं दिसत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आणि सातारा जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील हे लवकरच भाजप पक्षात प्रवेश करतील असे स्पष्ट संकेत त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहेत. शुक्रवारी कार्यकर्त्याचा मेळाव्यात ते या प्रवेशाची घोषणा करणार आहेत.

दरम्यान काँग्रेस आमदार आनंदराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली होती. अनेक वर्षांपासून पक्ष बांधणीचे काम मी केले पण काँग्रेसमधून मला बाहेर काढण्याचा जाणीवपूर्वक कट केला गेला असल्याचा आरोप आनंदराव पाटील यांनी केला आहे. मला डावलले जात आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मी निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली आहे. त्यामुळे काँग्रेसला आनंदराव पाटील यांच्याकडून मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS