सांगलीत काँग्रेसला धक्का, ‘या’ नेत्यानं बोलावला कार्यकर्त्यांचा मेळावा!

सांगलीत काँग्रेसला धक्का, ‘या’ नेत्यानं बोलावला कार्यकर्त्यांचा मेळावा!

सांगली – सांगलीत काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण काँग्रेसचे प्रदेश चिटणीस आणि शिराळा तालुक्याचे नेते सत्यजित देशमुख यांनी रविवारी आपल्या कार्यकर्त्यांचा ‘जनसंवाद मेळावा’ बोलावला आहे. ‘मला तुमच्याशी बोलायचं’ या टॅगलाईनने त्यांनी कार्यकर्यांचा मेळावा बोलावला आहे. या मेळाव्यात देशमुख हे विधानसभा निवडणुकीविषयी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

दरम्यान जनसंवाद मेळाव्याच्या पोस्टरमध्ये काँग्रेसच्या हाताचं चिन्ह नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे ते पक्ष सोडण्याची घोषणा या मेळाव्यात करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मागील काही दिवसांपासून सत्यजित देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कुरघोड्यामुळे देशमुख हे आक्रमक झाले आहेत. त्यामुळे उद्याच्या मेळाव्याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS