काँग्रेसच्या ‘या’ दोन युवा नेत्यांचं मनोमिलन, लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र!

काँग्रेसच्या ‘या’ दोन युवा नेत्यांचं मनोमिलन, लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र!

सांगली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दोन युवा नेत्यांचं मनोमिलन झालं आहे.  एकाच पक्षात असूनही एकमेकांवर नेहमीच टीका करणारे विश्वजित कदम आणि विशाल पाटील या काँग्रेसच्या दोन युवा नेत्याचे लोकसभा निवडणुकीत पुन्हा मनोमिलन झालं आहे.विशाल पाटील यांनी काल कडेगावमध्ये विश्वजित कदम यांची भेट घेतली. या भेटीतून पक्षांतर्गत वादावर पडदा टाकत या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीत एकमेकांना साथ देण्याचे आणि अंतर्गत गटबाजी टाळण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

दरम्यान सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे ते आपल्यावर नाराज असलेल्या नेत्यांची भेट घेऊन ते त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी विशाल पाटील आणि विश्वजित या दोघांनी उमेदवारीवरुन एकमेकांवर आरोप केल्यामुळे पक्षांतर्गत वातावरण तापलं होतं. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वसंतदादा गट आणि कदम गटातील वादाला तोंड फुटलं होतं. सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडेच राहावी यासाठी विश्वजित कदम यांनीही प्रयत्न केले होते. परंतु विशाल पाटील यांनी भेट घेतल्यानंतर या दोन्ही नेत्यांचे मनोमिलन झाले असल्याचं दिसत आहे.

COMMENTS