काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र, ईव्हीएमबाबत केली आणखी एक मागणी!

काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र, ईव्हीएमबाबत केली आणखी एक मागणी!

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएमला विरोध केल्यानंतर आता काँग्रेसनं ईव्हीएम असणाऱ्या गोडाऊन परिसराजवळ जॅमर लावावेत अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही मागणी केली असून यासंबंधी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे.थोरात यांनी यासंदर्भात निवडणूक अधिकारी यांना पत्र पाठवलं. मतमोजणीच्या वेळी स्ट्रॉंगरूमच्या आसपास इंटरनेट सुविधा बंद करावी अशी मागणीही काँगसने केली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणं गरजेचं आहे.

दरम्यान याआधी राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील मतमोजणी केंद्राबाहेर जॅमर लावण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. विधानसभा निवडणूकीच्या मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँंगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा तसेच मतदान ते मतमोजणी प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत या परिसरातील मोबाईल टॉवरही बंद ठेवावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.

मागील काही निवडणूकांपासून देशात ए.व्ही.एम. मशिन हॅकींगची जोरदार चर्चा होत आहे, त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी केलेल्या या मागणीला महत्व प्राप्त झाले आहे. मतदानासाठी वापरण्यात येणार्‍या मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर्स आणि वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भिती असून, निवडणूक प्रक्रीयेतून निष्पक्षता कायम रहावी या दृष्टीने आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सुरक्षेचा उपाय म्हणून मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये व मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रात जॅमर बसवण्यात यावेत, तसेच या दोन्ही जागांच्या परिसरातील मोबाईल टॉवर यंत्रणा दि.21 ऑक्टोबर, 2019 ते दि.24 ऑक्टोबर, 2019 पर्यंत बंद करण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, परळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ई-मेलद्वारे केली होती.

त्यानंतर आता काँग्रेसनं ईव्हीएम असणाऱ्या गोडाऊन परिसराजवळ जॅमर लावावेत अशी मागणी केली आहे.

COMMENTS