काँग्रेसच्या चौथ्या यादीत 27 उमेदवारांची नावे जाहीर!

काँग्रेसच्या चौथ्या यादीत 27 उमेदवारांची नावे जाहीर!

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं चौथी यादी जाहीर केली आहे. या चौथ्या यादीत पक्षाने २७ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. सोनिया गांधींच्या निवासस्थानी झालेल्या काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर ही यादी जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, केरळ, उत्तर प्रदेश आणि अंदमान निकोबार येथील जागांसाठी २७ उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. शशी थरूर यांना तिरुवअनंतपूरममधून उमेदवारी मिळाली आहे.

COMMENTS