औरंगाबाद आणि जालना मतदारसंघासाठी काँग्रेसकडून ‘यांना’ उमेदवारी निश्चित ?

औरंगाबाद आणि जालना मतदारसंघासाठी काँग्रेसकडून ‘यांना’ उमेदवारी निश्चित ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं औरंगाबाद आणि जालना मतदारसंघासाठी आपल्या उमेदवारांची नावं निश्चित केली असल्याची माहिती आहे. काँग्रेस पक्षातर्फे औरंगाबाद मतदारसंघातून सुभाष झांबड तर जालना मतदारसंघातून डॉ. कल्याण काळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती आहे. औरंगाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता. परंतु हा मतदारसंघ काँग्रेसने आपल्याकडेच ठेवला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान या मतदारसंघासाठी काँग्रेसने १४ उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पक्षश्रेष्ठींकडे नाव सूचविले होते. त्यापैकी काँग्रेसने औरंगाबादेतून झांबड, जालन्यातून काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असल्याची माहिती आहे. काँग्रेसची लवकरच दुसरी यादी जाहीर केली जाणार असून या यादीत औरंगाबाद आणि जालना मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसच्या दुस-या यादीकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS