लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी १५, १६ व १७ नोव्हेंबर रोजी काँग्रेसच्या बैठका !

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी १५, १६ व १७ नोव्हेंबर रोजी काँग्रेसच्या बैठका !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण दि. १५, १६ व १७ नोव्हेंबर रोजी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे बैठका घेणार आहेत. या बैठकांमध्ये राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राज्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

सदर बैठकांचे वेळापत्रक

गुरुवार दि. १५ नोव्हेंबर २०१८

मराठवाडा विभाग –  सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वा.

पश्चिम महाराष्ट्र – दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३० वा.

शुक्रवार दि. १६ नोव्हेंबर २०१८   

विदर्भ विभाग –  सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वा.

उत्तर महाराष्ट्र विभाग – दुपारी २.०० ते  सायंकाळी ५.०० वा.

शनिवार दि. १७ नोव्हेंबर २०१८

कोकण विभाग  – सकाळी १०.३० ते दुपारी १.०० वा.

COMMENTS