महाविकास आघाडीतील काँग्रेस नेते नाराज, सोनिया गांधींच्या भेटीची वेळ मागितली !

महाविकास आघाडीतील काँग्रेस नेते नाराज, सोनिया गांधींच्या भेटीची वेळ मागितली !

मुंबई – महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. याबाबत या नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली असल्याची माहिती आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोमवारी किंवा मंगळवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे सोनिया गांधी यांच्यासोबतच्या दिल्लीतील बैठकीत महाष्ट्रातील काँग्रेसचे सर्व मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील समन्वयाबाबत अनेक काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण काही दिवसांपूर्वी नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक पार पडली होती. परंतु समन्वय समितीतून नाराजी दूर होत नसल्यामुळ महाराष्ट्राचे काँग्रेस मंत्री सोनिया गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त करणार असल्याची चर्चा आहे.

COMMENTS