कर्नाटकमध्ये आता उपमख्यमंत्रीपदावरुन वाद !

कर्नाटकमध्ये आता उपमख्यमंत्रीपदावरुन वाद !

नवी दिल्ली  कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेचा वाद मावळत असतानाच आता उपमुख्यमंत्रीपदाच्या वादाचा उगम होताना दिसत आहे. जेडीएसचे कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तर उपमुख्यमंत्री कोणाला करायचं यावरुन आता राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे. काँग्रेसचे आमदार दलित उपमुख्यमंत्र्याची मागणी करत आहे तर लिंगायत आमदार लिंगायत उपमुख्यमंत्र्याची मागणी करत आहे.तसेच जेडीएसचे नेते आणि कर्नाटकचे होणारे मुख्यमंत्री कुमारस्वामी मुस्लीम किंवा दलित उपमुख्यमंत्र्यासाठी आग्रही आहेत.तसेच सुरुवातीपासूनच दलीत उपमुख्यमंत्री बनवण्यासाठी काँग्रेसचं म्हणणं आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्रीपदावरुन वाद रंगला असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान जी परमेश्वर यांना उपमुख्यमंत्री बनवलं गेलं पाहिजे. याबाबत काँग्रेस नेते गुंडु राव यांनी उपमुख्यमंत्रीपादाचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल असं म्हटलं आहे. तसेच भाजप कुमारस्वामी यांना सरकार स्थापन करण्यापासून रोखू शकते अशी शंका अजूनही काँग्रेसला असल्याचं बोललं जात आहे. कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करण्यापासून लांब ठेवण्यासाठी भाजप प्रयत्न करु शकते असं काँग्रेस नेते बी के हरिप्रसाद यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS