काँग्रेसला धक्का, ‘या’ आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश!

काँग्रेसला धक्का, ‘या’ आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश!

मुंबई – लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला धक्का बसला असून मुंबईतील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना कोळंबकर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. दक्षिण मध्य मुंबईतून युतीचे उमेदवार राहुल शेवाळेच विजयी होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वासही कोळंबकरांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान ‘मी काँग्रेसवर नाराज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलं म्हणून मला पक्षाने बाहेर केलं असल्याचं कोळंबकरांनी म्हटलं आहे. कोळंबकर मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुंबईतील पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून ते सहा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS