काँग्रेसला धक्का,’या’ आमदाराचा शिवसेनेत प्रवेश !

काँग्रेसला धक्का,’या’ आमदाराचा शिवसेनेत प्रवेश !

पुणे – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी धक्का बसला असून श्रीरामपूर येथील काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश तेला आहे. मागील आठवड्यात त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. आज अखेर त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. विद्यमान आमदाराने प्रवेश केल्यामुळे श्रीरामपूर मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे.

दरम्यान रायगड जिल्ह्यातील अवधूत तटकरे यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला असून तेसुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीचे खासदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पुतणे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीलाही रायगडमध्ये मोठा धक्का बसला आहे.

COMMENTS