मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाहेर पडलेल्या काँग्रेस आमदाराला बाळासाहेब थोरात म्हणाले “आजकाल दिसत नाहीत”!

मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाहेर पडलेल्या काँग्रेस आमदाराला बाळासाहेब थोरात म्हणाले “आजकाल दिसत नाहीत”!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच काँग्रेस आमदारानं मुख्यमंत्र्यांची वैयक्तिक भेट घेतल्यामुळे ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वैयक्तिक भेट घेतली. या भेटीनंतर बाहेर पडलेल्या आमदाराला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी गुगली टाकली. ‘काय भालके आहात कुठे? आजकाल दिसत नाहीत’ असं थोरात भालकेंना म्हणाले, यावर आमदार भालके यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

दरम्यान आज सह्याद्री अतिथीगृहावर पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ही भेट घेऊन काँग्रेसचं शिष्टमंडळ परतल्यानंतर आमदार भारत भालके हे मुख्यमंत्र्यांसोबतच राहिले. ही भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर भालके यांची बाळासाहेब थोरांतांशीही भेट झाली. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी गुगली टाकली. ‘काय भालके आहात कुठे? आजकाल दिसत नाहीत’ असं थोरात भालकेंना म्हणाले.

COMMENTS