महाविकास आघाडीत पुन्हा कुरबुय्रा, काँग्रेस आमदाराची एकनाथ शिंदेंविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

महाविकास आघाडीत पुन्हा कुरबुय्रा, काँग्रेस आमदाराची एकनाथ शिंदेंविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

मुंबई – महाविकास आघाडीतील कुरबुऱ्या अजूनही सुरु असून काँग्रेस आमदारानं एकनाथ शिंदेंविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
केली आहे. आमचा मान राखला जात नाही, शिवाय काँग्रेस आमदारांची कामं होत नाहीत, असा आरोप चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे आमदार यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली होती. यावेळी सुभाष धोटे यांनी ही तक्रार केली आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून काम रोखल्याचा आरोप सुभाष धोटे यांनी केला आहे. जर आमदारांचा मान राखला जात नसेल, काँग्रेस आमदारांची कामं होणार नसतील, तर लोकांमध्ये कसं जाणार असा सवाल धोटे यांनी विचारला आहे. धोटे यांच्या या नाराजीमुळे महाविकास आघाडीत पुन्हा कुरबुय्रा सुरु असल्याचं दिसत आहे.

COMMENTS