माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नका, काँग्रेसच्या युवा आमदाराला कोरोनाची लागण!

माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नका, काँग्रेसच्या युवा आमदाराला कोरोनाची लागण!

कोल्हापूर – माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोल्हापुरात उपचार सुरु आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती कोल्हापूरमधील काँग्रेसचे युवा आमदार ऋतुराज पाटील यांनी केली आहे. याबाबतचं ट्वीट ऋतुराज पाटील यांनी केलं आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच ऋतुराज पाटील यांनी जनतेला आवाहन केलं होतं. कोल्हापुरात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही ‘कोविड योद्धा’ म्हणून जबाबदारी पार पाडावी, “हे कोल्हापूर आहे, एकदा ठरलं की ठरलं, आता पुन्हा एकदा आमचं ठरलंय!” असा व्हिडीओ शेअर करत ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला आवाहन केलं होतं. “त्याला काय हुतंय?” हा शब्दप्रयोग वापरत ऋतुराज यांनी कानपिचक्या दिल्या होत्या. त्यानंतर ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.

COMMENTS