भाजपनं मलाही ऑफर दिली होती, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचा गौप्यस्फोट !

भाजपनं मलाही ऑफर दिली होती, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचा गौप्यस्फोट !

मुंबई – काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपनं मलाही ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट केला आहे. मलाही भाजपामध्ये घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यासाठी आमिष दाखवले होते. पण, मी कट्टर देशभक्त आणि काँग्रेसची कार्यकर्ती आहे. त्या अशा गोष्टी धुडकावून लावल्या असल्याचं प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याच्या निमित्ताने काँग्रेस भवनमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी प्रणिती शिंदे याही उपस्थित होत्या. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

दरम्यान भाजपामध्ये घेण्याचा प्रयत्न माझ्याही बाबत करण्यात आला. पण, माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. काँग्रेसशी निष्ठावंत असणाऱ्या शिंदे कुटुंबात माझा जन्म झालेला असल्याचं यावेळी प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. प्रणिती शिंदे यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

COMMENTS