काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ!

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ!

सोलापूर – काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचिया अडचणीत वाढ झाली असून मुख्य न्यायदंडाधिका-यांनी जामिनपात्र वॉरंट बजावले आहे. जिल्हा नियोजन बैठकीच्या वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करताना धक्काबुक्की करून पोलिसाला जखमी केल्याप्रकरणी न्यायालयात त्यांच्याविरोधीत खटला दाखल केला होता. परंतु दाखल असलेल्या खटल्याच्या तारखेला हजर न राहिल्यामुळे आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे यांना मुख्य न्यायदंडाधिका-यांनी जामिनपात्र वॉरंट बजावले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान ही घटना २ जानेवारी २0१८ रोजीची असून जिल्हा नियोजन बैठकीली जाताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी औषधोपचारावर झालेली दरवाढ रद्द करण्याची घोषणाबाजी करत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली होती. यामध्ये एक पोलीस जखमी झाला होता. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्यासह आंदोलकांवर सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. परंतु दाखल असलेल्या खटल्याच्या तारखेला हजर न राहिल्यामुळे आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे यांना मुख्य न्यायदंडाधिका-यांनी जामिनपात्र वॉरंट बजावले आहे. तसेच या प्रकरणात न्यायालयात हजर झालेल्या माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह सात जणांना सत्र न्यायालयाने आणखी दोन दिवस अंतरिम जामीन वाढवून दिला आहे.

COMMENTS