काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंची जीभ घसरली, पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका !

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंची जीभ घसरली, पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका !

मुंबई – काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. आपल्या देशात मोदींबाबा नावाचा डेंग्यूचा मोठा डास आला असल्याचं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. आपल्या देशात सर्वात मोठा डेंग्यूचा डास आला आहे. त्याचं नाव मोदीबाबा असून फवारणी करुन या डासाला पुढच्या वर्षी हाकलून लावायचा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना आजार होतोय असल्याचं प्रणिती यांनी म्हटलं आहे. सोलापूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

दरम्यान मोदींना ना बहिण आहे, बायको आहे ना मुलगी, त्यामुळे त्यांना महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल कळणार नाही. आई आहे पण नोटाबंदीवेळी तिला रांगेत उभं केलं ते पण फोटोसाठी. जग फिरतात पण कधी शेतकऱ्यांमध्ये येऊन त्यांची परिस्थिती पाहत नसल्याची टीकाही प्रणिती शिंदे यांनी केली आहे. मोदींना खोटं बोलण्याची सवय लागली आहे. 15 लाख जमा करुन देतो असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे कुठे गेले ते पैसे. नोटाबंदीमुळे सर्वसामन्यांना फटका बसला असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

 

COMMENTS