काँग्रेसला मोठा धक्का, आणखी एका आमदाराचा राजीनामा!

काँग्रेसला मोठा धक्का, आणखी एका आमदाराचा राजीनामा!

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचा युवा चेहरा असलेले आमदार अल्पेश ठाकोर यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. तसेच ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसचा हात सोडल्याने गुजरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान लोकसभा निवडणुकांमधील जागावाटपावरुन अल्पेश ठाकोर हे काँग्रेसवर नाराज होते. कारण गुजरातमधील चार लोकसभा जागांवर आपल्या जवळच्या उमेदवारांना उमेदवारी देण्याची मागणी ठाकोर यांनी काँग्रेसकडे केली होती. गुजरातमधील पाठण, मेहसाणा, बनासकांठा आणि साबरकांठा या चार जागांवर आपल्या उमेदवारांना तिकीट द्याव, अशी मागणी अल्पेश ठाकोर यांची होती. मात्र, त्यांच्या या मागणीकडे काँग्रेसने दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

COMMENTS