काँग्रेसच्या ‘या’ आमदारानं सोपवला राजीनामा, उद्या शिवसेनेत करणार प्रवेश!

काँग्रेसच्या ‘या’ आमदारानं सोपवला राजीनामा, उद्या शिवसेनेत करणार प्रवेश!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला जोरदार धक्का बसला असून आमदार निर्मला गावित यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला आमदारकीचा राजीनामा सोपवला आहे. तसेच गावित या उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर मकदारसंघातून सलग दोन वेळेस त्या निवडून आल्या असून तिसय्रा वेळेस त्या शिवसेनेचून निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान निर्मला गावित शिवसेना प्रवेश उद्या सकाळी साडे अकरा वाजता करणार आहेत.
त्या आजच शिवसेनेत प्रवेश करणार होत्या परंतु शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या पत्नीचे निधन झाले म्हणून पक्ष प्रवेश उद्यावर गेला आहे.

राजीनामा दिल्यानंतर निर्मला गावित यांनी प्रतिक्रिया दिली असून गांधी घराण्याशी आम्ही एकनिष्ठ होतो. जिल्ह्यातील राजकारणामुळे वडील नाराज होते. पक्षाने भावासाठी लोकसभेचं तिकीट नाकारलं होत. माझा निर्णय माझ्या मतदारसंघासाठी आहे. मतदारसंघातील विकासकामांसाठी शिवसेनेत जाण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता. काँग्रेसबद्दल कोणतीही नाराजी नाही. भावाने कोणत्या पक्षात जावं हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे. त्याला विधानसभेला तिकीट अपेक्षित होतं, पण शब्द मिळाला नाही. माझे वडील आहे तिथेच आहेत, त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे, त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला असल्याचं गावीत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल व त्यांचे बंधू दिग्विजय बागलही उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे पक्षनेतृत्व कामाची कदर करत नसल्याने पक्ष सोडणार असल्याचे रश्मी यांनी यापूर्वी सांगितले होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला बागल यांच्या रुपाने मोठा धक्का बसला आहे.

COMMENTS