माढ्यात काँग्रेसला धक्का, आणखी एका आमदाराचा भाजपला पाठिंबा!

माढ्यात काँग्रेसला धक्का, आणखी एका आमदाराचा भाजपला पाठिंबा!

पंढरपूर – लोकसभा निवडणूक अवघ्या काही तासांवर आली आहे. अशातच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून माण खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजित निंबाळकर यांना पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.  माण खटाव तालुक्यातील बोराटवाडीमध्ये काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा काल पार पडला. यावेळी त्यांनी निंबाळकर यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान  या मेळाव्याला तालुक्यातून हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते हजर होते. यावेळी परिस्थिती वेगळी असून आपण काँग्रेसवर जरी नितांत प्रेम करत असलो, तरी आपल्या भागाला पाणी आणण्याच्या कामाची सुरुवात रणजित निंबाळकर यांच्या वडिलांनी केली’ तसेच ज्यांना राष्ट्रवादीला मतदान करावंसं वाटतं, त्यांनी हात वर करावेत’ असं आवाहन जयकुमार गोरे यांनी केलं. त्यावेळी कोणीही हात वर न केल्यावर ज्यांना रणजित निंबाळकर यांना मतदान करावंसं वाटतं, त्यांना हात वर करण्याचं आवाहन करताच सर्वच कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्या वाजवत हात वर केले. त्यामुळे गोरे यांनी भाजपला पाठिंबा देण्याचे संकेत दिले असल्याचं दिसत आहे.

COMMENTS