‘या’ आमदारानं सोडला काँग्रेसचा हात, युतीचा प्रचार करणार!

‘या’ आमदारानं सोडला काँग्रेसचा हात, युतीचा प्रचार करणार!

मुंबई – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून मुंबईतील काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे युतीचा प्रचार करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांनी माझ्याशी संपर्क साधलेला नसुन राहुल शेवाळे माझ्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मी युतीचा प्रचार करणार असल्याचं कोळंबकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गेली काही दिवसांपासून दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील वडाळ्याचे काँग्रेस आमदार कोळंबकर  हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.  त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या कार्यालयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्वत:चा फोटो असलेला बॅनर लावला होता. कोळंबकरांनी लावलेल्या बॅनरमध्ये काँग्रेसच्या एकाही नेत्याचा फोटो नसल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहेत. अशातच आता कोळंबकर यांनी युतीला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत.

COMMENTS