काँग्रेसच्या ‘या’ बंडखोर आमदाराची पक्षातून हकालपट्टी !

काँग्रेसच्या ‘या’ बंडखोर आमदाराची पक्षातून हकालपट्टी !

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षाच्या खराब कामगिरीवरून काँग्रेस नेत्यांवर टीका करणारे शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार आर रोशन बेग यांची पक्षातुन हकालपट्टी करण्यात आली आहे. बेग यांनी काँग्रेसच्या ‘फ्लॉप शो’ साठी सिद्धरामय्या यांचा अहंकार आणि केपीसीसीचे अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांची अपरिपक्वता जबाबदार असल्याचे म्हटले होते.त्यामुळे कर्नाटक काँग्रेसने पक्ष विरोधी कामे करणारे बंडखोर आमदार आर रोशन बेग यांना तत्काळ निलंबीत केले आहे. पक्ष विरोधी कामे केल्याबद्दल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने आमदार आर रोशन बेग यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावास मंजूरी दिली असल्याचं प्रदेश काँग्रेसनं पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान रोशन बेग हे सात वेळा काँग्रेसचे आमदार झालेले आहेत. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते व संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना जोकर असे म्हटले होते. याशिवाय भाजपाच्या विजयानंतर रोशन बेग यांनी काँग्रेस विरोधात वक्तव्य केले होते. तसेच, अल्पसंख्यांकांनी भाजपाबरोबर जायला हवे असे देखील ते म्हणाले होते.त्यामुळे बेग यांना ही भूमिका आता चांगलीच महागात पडली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS