काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर !

काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आमदार भारत भालके भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार भालके यांच्या पंढरपूर येथील घरी भेट देणार आहेत. ही त्यांची सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी भेटीमागे राजकीय कारण असल्याची चर्चा आहे. भालके यांना राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातून भाजपात आणले जात असल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान भालके हे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. आमदार भारत भालके विधानसभेत अनेक प्रश्नावर आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी पाणीप्रश्न आणि दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले होत्. परंतु आता तेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि भालके यांच्या भेटीकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS