काँग्रेसने मोदींची उडवली खिल्ली, ट्विटरवर टाकला व्हिडिओ, भाजपने दिले जोरदार प्रत्युत्तर !

काँग्रेसने मोदींची उडवली खिल्ली, ट्विटरवर टाकला व्हिडिओ, भाजपने दिले जोरदार प्रत्युत्तर !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलिंगन देण्याच्या प्रकारावरुन काँग्रेसने नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली आहे. त्याचा व्हिडिओ काँग्रेसने त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे. इस्त्राईलचे पंतप्रधान बँजामीन नेतानॅव्हू हे काल 6 दिवसांच्या भारत दौ-यावर आले आहेत. मोदींनी प्रोटोकॉल तोडत इस्त्राईलच्या पंतप्रधनांची गळाभेट घेतली. त्यावरुन काँग्रेसनं मोदींवर टीका करत त्यांचा व्हिडिओ ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे.

भाजपनं यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसनं पंतप्रधानांवर टीका करताना पातळी सोडली आहे. काँग्रेस निराशेपोटी असे उद्योग करत असल्याचा आरोप केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. जगात मोदींनी तिस-या क्रमांकाचे प्रभावी नेते म्हणून मान्यता मिळाल्यामुळे काँग्रेस हादरली असल्यचंही प्रकाश जावडेकर म्हणाले.

https://twitter.com/INCIndia/status/952469912554946561

COMMENTS