उत्तर मुंबईतून भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात या अभिनेत्रीला उमेदवारी?

उत्तर मुंबईतून भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात या अभिनेत्रीला उमेदवारी?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर मुंबईतून भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी काँग्रेसकडून चाचपणी सुरु आहे. अशातच उत्तर मुंबईतून ‘रंगीला’ गर्ल उर्मिला मातोंडकरची उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये चर्चा सुरु झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असून त्यांना याठिकाणी उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी भाजपचे तगडे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात एखादा लोकप्रिय आणि ग्लॅमरस चेहरा देण्याची काँग्रेसची रणनीती आहे
या ठिकाणी आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे यांनीही काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. परंतु उर्मिला मातोंडकर यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

COMMENTS