‘प्रत्येक जिल्ह्यात एक जागा द्या’, मुस्लिम नेत्यांची काँग्रेसकडे मागणी !

‘प्रत्येक जिल्ह्यात एक जागा द्या’, मुस्लिम नेत्यांची काँग्रेसकडे मागणी !

कर्नाटक – कर्नाटकमधील मुस्लिम नेत्यांनी आज काँग्रेसच्या निवडणूक समितीची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी विधानसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिम उमेदवारांसाठी राखीव जागा ठेवण्याची मागणी केली आहे. माजी खासदार के. रहमान खान यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधील मुस्लिम नेत्यांनी नवी दिल्लीत पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्यांची भेट घेतली व यावेळी मुस्लिमांना जास्तीत जास्त का संधी मिळाली पाहिजे ? ते पटवून देण्याचा प्रयत्न यावेळी त्यांनी केला आहे. त्यामुळे रहमान यांची मागणी मान्य होणार का याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान ज्या भागातून आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशा मतदारसंघातून आम्ही मुस्लिमांसाठी उमेदवारी मागत असल्याचं के. रहमान यांनी म्हटलं आहे. योग्य संधी मिळाली तर २८ जागांवर मुस्लिम उमेदवार निवडून येतील असा त्यांनी दावा केला आहे. २०१३ मध्ये काँग्रेसने विविध मतदारसंघातून १९ मुस्लिम उमेदवारांना संधी दिली होती. त्यापैकी १० उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे या निवडणुकीतही काँग्रेस नेतृत्व मुस्लिम उमेदवारांना संधी देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS