महाआघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम, राष्ट्रवादीकडून जास्त जागांची मागणी !

महाआघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम, राष्ट्रवादीकडून जास्त जागांची मागणी !

नवी दिल्ली – राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जागावाटपाचा तिढा कायम असल्याचं दिसत आहे. याच मुद्यावर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात नवी दिल्लीत बुधवारी सायंकाळी बैठक झाली. या बैठकीत जास्त जागा सोडाव्यात अशी मागणी राष्ट्रवादीने केली असल्याची माहिती आहे. जागावाटपासाठी राज्यातील नेत्यांमध्ये मुंबईत झालेल्या चर्चेच्या फेऱ्यांमध्ये ४० जागांवर एकमत झाले आहे. परंतु इतर जागावाटपाचा तिढा सुटत नसल्यामुळे आता पवार आणि गांधी यांच्या पातळीवर सोडविला जात आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील जागावाटप आपल्या कलाने व्हावे, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न असून काँग्रेसने २५ तर राष्ट्रवादीने २३ जागा लढवाव्या, असा काँग्रेस नेत्यांचा प्रस्ताव आहे. तसेच जागावाटपात लोकसभा आणि विधानसभेत निम्म्या जागा मिळाल्या पाहिजेत, असा आग्रह राष्ट्रवादीने धरला होता. लोकसभेसाठी काँग्रेस २६ तर राष्ट्रवादी २२ जागांचे सूत्र २००४ आणि २००९ मध्ये निश्चित झाले होते. २०१४ मध्ये काँग्रेसने २७ तर राष्ट्रवादीने २१ जागा लढविल्या होत्या. यंदा जास्त जागांची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. त्यामुळे आता यालर काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS