काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा नांदेडमध्ये, दिग्गज नेते राहणार उपस्थित !

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा नांदेडमध्ये, दिग्गज नेते राहणार उपस्थित !

नांदेड – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची पहिली प्रचार सभा नांदेडमध्ये होणार आहे. 20 फेब्रुवारीला स्टेडियम परिसरातील इंदिरा गांधी मैदानावर सायं. ५ वाजता ही सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रचार सभेला सर्वांनी एकत्रित येण्याचं आवाहन काँग्रेस-राष्ट्रवादीनं केलं आहे.

या संयुक्त प्रचार सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, महाराष्ट्राचे प्रभारी व लोकसभेतील काँग्रेसचे नेते खा. मल्लिकार्जुन खरगे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जोगेंद्र कवाडे यांच्यासह, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ,

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गुजरात काँग्रेसचे प्रभारी खा. राजीव सातव, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री आ.डी.पी.सावंत,  आदींची उपस्थिती राहणार आहे.

COMMENTS