काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील ‘या’ जागेवर अजूनही तिढा कायम, अंतिम निर्णय नाही!

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील ‘या’ जागेवर अजूनही तिढा कायम, अंतिम निर्णय नाही!

मुंबई – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील अजूनही एका जागेवर तिढा कायम आहे. त्यामुळे हा तिढा कधी सुटणार हे पाहणं गरजेचं आहे. सांगलीच्या जागेवर हा तिढा कायम असून ही जागा काँग्रेसकडे आहेे. परंतु काँग्रेसनं ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याचे ठरवले आहे.परंतु काँग्रेसमधील गटाने बंड केल्याने अजूनही त्या जागेबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे आज महाआघाडीची घोषणा होणार आहे.यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत जागावाटपावरुन रस्सीखेच पहायला मिळाली आहे. दक्षिण नगरची जागा काँग्रेसला हवी होती. राष्ट्रवादीने औरंगाबादची जागा काँग्रेसकडे मागितली होती. औरंगाबादच्या बदल्यात नगर असा प्रस्ताव राष्ट्रवादीने दिला होता.पण नगरची जागा राष्ट्रवादीने सोडली नाही आणि सुजय विखे पाटील सोडून गेले. तसेच काँग्रेसने पण औरंगाबाद जागा सोडली नाही आणि उमेदवार जाहीर करून टाकला आहे.

तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादीने हातकणंगले जागा सोडली तर काँग्रेसने आपल्या कोट्यातून एक जागा सोडणे अपेक्षित होते. सांगली जागा सोडण्याचे ठरवले पण काँग्रेसमधील गटाने बंड केल्याने अजूनही त्या जागेबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. पालघरची जागा बहुजन विकास आघाडीला काँग्रेस आपल्या कोट्यातून सोडत आहे. याबाबतची घोषणा आज होणार असून सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली जाण्याची शक्यता आहे.

COMMENTS