जळगाव महापालिकेसाठी अखेर काँग्रेस – राष्ट्रवादीचं जमलं, आघाडीवर शिक्कामोर्तब !

जळगाव महापालिकेसाठी अखेर काँग्रेस – राष्ट्रवादीचं जमलं, आघाडीवर शिक्कामोर्तब !

जळगाव – महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी करण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे. जळगावमध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. जागावाटपासाठी आता पुन्हा दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. दोन्ही पक्षांकडून दोन दोन नेत्यांची एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ती समिती वादाचे मुद्दे आणि तिकीट वाटप यावर निर्णय घेणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला पक्षाचे 10 नगरसेवक हजर होते. तर 2 गैरहजर होते. त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र सर्व नगरसेवक पक्षासोबत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.

गेल्या पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि खान्देश विकास आघाडी सत्तेत होते. यावेळी मात्र खान्देश आघाडी, मनसे आणि भाजप एकत्र लढण्याची शक्यता आहे. मनसेनं तर यापूर्वीच खान्देश आघाडीच्या चिन्हावर निवडणुक लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. तर भाजपमध्ये खान्देश आघाडीसोबत जाण्यावरुन खडसे आणि महाजन यांच्यात वाद सुर झालाय. त्यामुळे भाजप खान्देश विकास आघाडीत सामिल होतो की वेगळा लढतो ते येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

COMMENTS