आज नांदेड येथे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा !

आज नांदेड येथे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा !

नांदेड – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीतील मित्रपक्षांची संयुक्त प्रचार सभा आज दि.२० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता नांदेड येथील स्टेडियम परिसरातील इंदिरा गांधी मैदानावर होणार आहे.

या संयुक्त प्रचार सभेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी खा.मल्लीकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जोगेंद्र कवाडे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ,  विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गुजरात काँग्रेसचे प्रभारी खा.राजीव सातव, माजी मंत्री रोहिदास पाटील,  माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार,माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री आ.डी.पी.सावंत, आदींची उपस्थित राहणार आहेत.

त्यामुळे या सभेत काँग्रेस-राष्ट्रवादीतयचे नेते काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS