आघाडीच्या घटक पक्षांची बैठक संपली, काँग्रेस-राष्ट्रवादीकडे एवढ्या जागांची मागणी!

आघाडीच्या घटक पक्षांची बैठक संपली, काँग्रेस-राष्ट्रवादीकडे एवढ्या जागांची मागणी!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीच्या घटक पक्षांची बैठक संपली. या बैठकीत घटकपक्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जागा वाढवून देण्याची मागणी केली आहे.
घटक पक्षांनी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे 55 ते 60 जागांची मागणी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने घटक पक्षांसाठी 38 जागा सोडल्या आहेत परंतु काँग्रेस, राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव घटक पक्षांना मान्य नाही. 55 ते 60 जागांचा प्रस्ताव घेऊन घटक पक्षाचे नेते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटणार आहेत.या घटक पक्षांचे नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी करणार आहेत. त्यामुळे आता यावर काय तोडगा निघतो ते पाहण गरजेचं आहे.

दरम्यान काँग्रेसकडून आमच्या मागण्या मान्य होताना दिसत नाहीत. आम्ही 10 जागा मागितल्या आहेत. त्यातील दर्यापूर आणि अचलपूर या जागा आम्हाला हव्याच आहेत अशी भूमिका रिपब्लिकन गवई गटाचे राजेंद्र गवई यांनी घेतली आहे. अचलपूरमधून बच्चू कडू निवडून येत आहेत, ती जागा मला स्वतःला लढायची आहे असे असेल तर काँग्रेसची स्थिती बिकट आहे असंही गवई यांनी म्हटलं आहे.

राजू शेट्टी विधानसभा निवडणूक लढवणार

दरम्यान या बैठकीत आघाडीतील घटक पक्षांनी राजू शेट्टी यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह केला आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह आहे. त्यामुळे राजू शेट्टीही निवडणूक लढवण्यास तयार असल्याची माहिती आहे. चंद्रकांत पाटील निवडणूक लढवणार असतील तर मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी निवडणूक लढवली नाही तर शिरोळमधून निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचंही शेट्टी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS