उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे तर काँग्रेसचा ‘हा’ नेता होणार विधानसभा अध्यक्ष?

उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे तर काँग्रेसचा ‘हा’ नेता होणार विधानसभा अध्यक्ष?

मुंबई – उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे जाणार असल्याची चर्चा होती. परंतु उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच असेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. आमच्याकडे बहुमत आहे आणि विश्वासदर्शक ठराव आम्ही जिंकू त्याची मला खात्री आहे. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असेल मात्र कोण होईल याचा निर्णय शरद पवार घेतील. भाजप जो आरोप करत आहे हंगामी अध्यक्ष आम्ही निवडला आहे, तर त्यांना तसं बोलण्याचा अधिकार असल्याचंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस आमदार नाना पटोले यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पटोले यांच्या नावाची घोषणा केली आहे. ज्येष्ठ सदस्य असलेले नाना पटोल विधानसभा अध्यक्ष होतील असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. तर भाजपही विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून ठाणे जिल्ह्यातल्य़ा मुरबाडचे आमदार किसन कथोरे अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS