राष्ट्रवादी-काँग्रेस व मित्र पक्षाच्या महाआघाडीची उद्या  परळीत जाहीर सभा !

राष्ट्रवादी-काँग्रेस व मित्र पक्षाच्या महाआघाडीची उद्या परळीत जाहीर सभा !

परळी – केंद्र आणि राज्यातील फसव्या सरकारविरूध्द हल्लाबोल करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्र पक्षाच्या महाआघाडीची शनिवार दि.23 फेब्रुवारी रोजी परळी शहरात विराट जाहीर सभा होत आहे. केंद्रात आणि राज्यातील सरकार विरूध्द परिवर्तनाचा लढा उभारलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा समारोपही या सभेत होणार असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.श्री.शरदचंद्रजी पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे या सभेत प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. याशिवाय माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित दादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पीआरपी पक्षाचे अध्यक्ष आ.श्री.जोगेंद्र कवाडे, शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील, यांच्यासह मान्यवरांची ही या सभेला उपस्थिती राहणार असून, या सभेसाठी आणि नेत्यांच्या स्वागतासाठी परळी नगरी अक्षरशः सजुन गेली आहे.

सायंकाळी 06 वाजता वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील विस्तीर्ण मैदानात ही सभा होणार असून, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भव्य व्यासपीठ आणि किमान एक लाख लोक येतील या अंदाजाने बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. संपुर्ण शहर स्वागतांच्या कमानी, डिजिटल बॅनर्स, पक्षांचे झेंडे, टॉवर्स, पताका यांनी सजले आहे.

या सभेस विधान सभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री पद्मसिंह पाटील, गणेश नाईक, शशिकांत शिंदे, नवाब मलिक, कॉंग्रेसचे लातूरचे आमदार अमित भैय्या देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्ष श्रीमती फौजिया खान, माजी खा.रजनीताई पाटील, सौ.चित्राताई वाघ, माजी मंत्री राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर, रिपाई गवई गटाचे प्रदेश सरचिटणीस मधुकर मांजरमकर, जयदेव गायकवाड, राणा जगजितसिंह पाटील, माजी आ.सुरेश नवले, कमलकिशोर कदम, आ.सतिश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ.राहुल मोटे, आ.भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, बाबाजानी दुर्राणी, विजय भांबळे, मधुसूदन केंद्रे, रामराव वडकुते, बाबासाहेब पाटील, जीवनराव गोरे, अजिंक्य राणा पाटील, राजेश विटेकर, ही जिल्ह्या बाहेरील नेते मंडळी ही सभेस उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, माजी आ.अमरसिंह पंडित, राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, सौ.उषाताई दराडे, पृथ्वीराज साठे, अक्षय मुंदडा, राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, ज्येष्ट नेते प्रा.टी.पी.मुंडे, सिराज देशमुख, माजी मंत्री पंडितराव दौंड, मोहनराव सोळंके, राधाकृष्ण होके पाटील, सुशिलाताई मोराळे, मोहन गुंड, सुभाष राऊत, माकपाचे पी.एस.घाडगे, संजय दौंड, बाळासाहेब आजबे काका, सतिश शिंदे, महेंद्र गर्जे, राजेश देशमुख व मित्र पक्षांचे पदाधिकारीही सभेस उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने रायगडावरून सुरू केलेल्या परिवर्तन यात्रेचा समारोप या सभेने होणार आहे. नांदेड नंतर परळी येथे महाआघाडीची ही दुसरी सभा परळीत होत असल्याने संपुर्ण राज्याचे या सभेकडे लक्ष लागले आहे. या सभेतून आगामी लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सभेचे निमंत्रक तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.

COMMENTS