काँग्रेस-राष्ट्रवादीतील कट्टर विरोधक असलेले हे नेते आज एकाच व्यासपीठावर!

काँग्रेस-राष्ट्रवादीतील कट्टर विरोधक असलेले हे नेते आज एकाच व्यासपीठावर!

बारामती – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते एकमेकांपासून तुटले असल्याचं पहावयास मिळाले आहे. तर काही कट्टर विरोधक असलेले नेते एकत्रित आले आहेत.  काँग्रेस राष्ट्रवादीतीलही कट्टर विरोधक असलेले हे नेते आज एकाच व्यासपीठावर आले आहेत. मागील अनेक वर्षांच्या राजकारणात विळ्या-भोपळ्याचं नातं असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे दोन नेते आज एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.  आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं हे नेते एकत्र आले आहेत.

दरम्यान  2014 मधील विधानसभा निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाल्यानंतर राष्ट्रवादीनं हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात दत्तात्रय भरणे यांना मैदानात उतरवलं होतं. त्यावेळी भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. तेव्हापासून पवार-पाटील यांच्यातील संघर्ष अधिकच वाढला होता. मागील दोन-तीन वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र काम करत असतानाही इंदापूरमध्ये मात्र वेगळंच चित्र पहायला मिळालं होतं. या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाल्यानंतर आपले मतभेद विसरुन या नेत्यांची जवळीकता आता वाढली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS