‘या’ लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सुरुंग, काँग्रेसचा राष्ट्रवादीच्या उमेदवारावर आरोप !

‘या’ लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सुरुंग, काँग्रेसचा राष्ट्रवादीच्या उमेदवारावर आरोप !

मुंबई– आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीनं महाआघाडीची स्थापना केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काही मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे त्या उमेदवारांकडून आपल्या मतदारसंघात संपर्क अभियान सुरु केलं आहे. परंतु निवडणुकीच्या अगोदरच या महाआघाडीत बिघाडी येत असल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गुलाबराव देवकर काँग्रेस पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेत नसल्याचा आरोप काँग्रेस पदाधिका-यांनी केला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर हा आरोप केला आहे.

दरम्यान पक्षनेतृत्वानं आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. देवकरांनी सोमवारी चाळीसगाव, भडगाव आदी तालुक्‍यातून संपर्क अभियान सुरू केले आहे. परंतु या अभियानात काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेतलं नसल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

तसेच रावेर लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळाल्यास काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचार करणार नाहीत, अशी भूमिका कार्यकर्त्यांची असल्याचेही ॲड. पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आघाडीच्या सुरुवातीलाच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं दिसत आहे.

COMMENTS