काँग्रेस-राष्ट्रवादीतील ‘या’ दोन जागांमध्ये अदलाबदली ?

काँग्रेस-राष्ट्रवादीतील ‘या’ दोन जागांमध्ये अदलाबदली ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. परंतु काही मतदारसंघात मतभेद सुरु असल्यामुळे त्याठिकाणची उमेदवारी अजून जाहीर करण्यात आली नाही. यामध्ये उस्मानाबाद आणि औरंगाबाद या दोन जागांचाही समावेश आहे. परंतु
या दोन्ही मतदारसंघाची अदलाबदली होण्याची शक्यता आहे. औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला आणि उस्मानाबादची जागा काँग्रेसला देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये या जागांबद्दल एकमत झालं तर उस्मानाबादमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना उमेदवारी मिळू शकते. तर औरंगाबादमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण उमेदवार असतील असं बोललं जात आहे.

तसेच मागील काही वर्षांपासून उस्मानाबादची जागा राष्ट्रवादीकडे आहे. या भागात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे व्याही पद्मसिंह पाटील यांचं वर्चस्व आहे. 2009 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून ते विजयी झाले होते. तर 2014 साली शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांनी त्यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादीकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. अर्चना पाटील यांनी मागणी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघाची अदलाबदली होणार का हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS