‘या’ मतदारसंघातील जागेवर काँग्रेसच्या उमेदवारीचा संभ्रम, राष्ट्रवादीच्या नेत्यानं व्यक्त केली इच्छा !

‘या’ मतदारसंघातील जागेवर काँग्रेसच्या उमेदवारीचा संभ्रम, राष्ट्रवादीच्या नेत्यानं व्यक्त केली इच्छा !

सांगली – आगामी लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून उमेदवाराची घोषणा केली जात आहे. परंतु काँग्रेस -राष्टेरवादी आघाडीतील काही जागांवरील उमेदवारीचा अजून सुटला असल्याचं दिसत नाही. कारण काँग्रेसच्या वाटेला आलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारीचा अद्याप संभ्रम पहावयास मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आपण ही निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे.

सांगलीची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास, यात मला संधी मिळेल आणि त्यावर माझाच दावा असेल असं दिलीप पाटील यांनी म्हटलं आहे. कै. राजारामबापू पाटील यांच्यावर प्रेम करणारे जिल्ह्यातील अजितराव घोरपडे, संभाजी पवार, रावसाहेब पाटील, बसरवराज पाटील आणि आमदार विलासराव जगताप हे सुद्धा मला निवडणुकीत मदत करतील असंही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS