काँग्रेस-राष्ट्रवादीत एकमत, बैठकीनंतर दोन्ही पक्षातील नेत्यांचं मोठं वक्तव्य!

काँग्रेस-राष्ट्रवादीत एकमत, बैठकीनंतर दोन्ही पक्षातील नेत्यांचं मोठं वक्तव्य!

नवी दिल्ली – राज्यात सत्तास्थापन करण्याबाबत आज पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी दोन्ही पक्षांची स्वतंत्र आणि नंतर एकत्र बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात एकमत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर उद्या मुंबईत आघाडीतील घटकपक्षांशी चर्चा करु. या चर्चेनंतर शिवसेनेशी चर्चा केली जाणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज सकाळी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी काँग्रेस नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नसीम खान, नितीन राऊत, मल्लिकार्जुन खर्गे, के सी वेणूगोपाल, बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचीही बैठक सुरु पार पडली. या दोन्ही बैठकांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र बैठक झाली.

या बैठकीला काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. त्यानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी भूमिका मांडली. तसेच मुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलेलं नाही, दिल्लीतील बैठक झाली, आता मुंबईत चर्चा करु असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

COMMENTS