‘हे’ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यास काँग्रेस पदाधिका-यांचा विरोध, तर विखे-पाटलांचा मुलाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न !

‘हे’ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यास काँग्रेस पदाधिका-यांचा विरोध, तर विखे-पाटलांचा मुलाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न !

मुंबई – मुंबई वगळता राज्यातील 42 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने तीन दिवसांची बैठक बोलवली आहे. पहिल्या दोन दिवसात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत पुणे मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यास विरोध करण्यात आला आहे. तसेच पुणे, यवतमाळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडायला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. तर नगर राष्ट्रवादीकडून घेऊन सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी द्यावी यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील आग्रही आहेत. नगरमधून आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून विखे पाटील यांनी फिल्डींग लावली आहे. नगर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे, तो काँग्रेसला मिळावा आणि त्याठिकाणी आपला मुलगा सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी मिळावी असा प्रयत्न विखे पाटलांकडून केला जात आहे.

दरम्यान पुण्यातून माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवलकर, अनंत गाडगीळ, अभय छाडेज आदी निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. तर लातूर मतदारसंघातून सगळ्यात जास्त म्हणजे 51 जणांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली.  तर बारामती मतदारसंघात 13 जणांनी काँग्रेसकडे तिकीट मागितलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील पक्षनेतृत्वासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

तसेच यवतमाळ लोकसभा मतदारसंघात माणिकराव ठाकरे आणि त्यांचा मुलगा राहुल ठाकरे यांनी उमेदवारी मिळावी यासाठी मागणी केली आहे. तर माजी मंत्री शिवाजीराव मोघेही याठिकाणी इच्छूक आहेत. तर नागपूर लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकीकडे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी पाठ फिरवली असून नागपूरमधून विकास ठाकरे, राजेंद्र मुळक, बबनराव तायवडे, प्रफुल गुडदे इच्छूक आहेत.

तर नाशिक आणि रावेरची जागा राष्ट्रवादीकडून परत घेण्याची मागणही या बैठकीत करण्यात आली आहे. रावेरसाठी डॉ.उल्हास पाटील इच्छूक आहेत. त्यामुळे उमेदवार निवडीचा हा पेच काँग्रेस – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कसा सोडवणार हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS