उद्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करणार मोठी घोषणा !

उद्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करणार मोठी घोषणा !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून उद्या संध्याकाळी चार वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. यादरम्यान काँग्रेस- राष्ट्रवादीसह घटक पक्षांच्या महाआघाडीची घोषणा केली जाणार आहे. आघाडीसोबत असलेल्या घटक पक्षांची घोषणा केली जाणार असून राजू शेट्टी, हितेंद्र ठाकूर यांच्यासह आणखी घटक पक्षाचे नेते आघाडीसोबत आले आहेत. त्यामुळे या घटकपक्षांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे.

दरम्यान हितेंद्र ठाकूर यांच्या बहूजन विकास आगाडीने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे  पालघर लोकसभेची जागा बहुजन विकास आघाडीला सोडणार असल्याची घोषणाही उद्याच्या पत्रकर परिषदेत केली आहे.

COMMENTS