काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची शरद पवारांच्या घरी दोन तासांची बैठक!

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची शरद पवारांच्या घरी दोन तासांची बैठक!

नवी दिल्ली – राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. सत्तास्थापनेबाबत दिल्लीत वेगवान घडामोडी घडत आहेत. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकावर बैठका सुरु आहेत. काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींशी चर्चा केल्यानंतर जवळपास दोन तास शरद पवार यांच्या निवासस्थानी बेठक घेतली. या बैठकीला काँग्रेस-राष्ट्रवादीचे 15 नेते उपस्थित होते.

या बैठकीला राष्ट्रवादीकडून अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, सुनील तटकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, नवाब मलिक तर काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, जयराम रमेश, सी वेणुगोपाल, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान यांच्यासह एकूण 15 नेते उपस्थित होते.

शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या एन्ट्रीमुळे नवा ट्वीस्ट

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दिल्लीत किमान समान कार्यक्रमाची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची अचनाक या बैठकीमध्ये सहभागी झाल्याने सगळ्यांना सप्राईज मिळालं. शरद पवार या बैठकीत उपस्थित राहणार नसल्याची चर्चा होती पण पवारांच्या अचानक एन्ट्रीमुळे नवा ट्वीस्ट समोर आला आहे.

COMMENTS