काँग्रेस – राष्ट्रवादीतील ‘हे’ तीन आमदार करणार भाजपात प्रवेश !

काँग्रेस – राष्ट्रवादीतील ‘हे’ तीन आमदार करणार भाजपात प्रवेश !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीतील आणखी तीन आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे. यामध्ये काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अक्कलकोटचे काँगेस आमदार सिद्धाराम म्हेत्रे पंढरपुरातील मंगळवेढ्याचे काँग्रेस आमदार भारत भालके आणि माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे हे तीन आमदार भाजपात जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान हे तीनही आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. जुलै महिन्यात काँग्रेसकडून सोलापूरमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीला अक्कलकोटचे काँग्रेस आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांनी थेट दांडी मारली होती. तेव्हापासून म्हेत्रे आणि भालके यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. दुसरीकडे पंढरपूरचे आमदार भारत भालके देखील काही दिवसांपासून मुख्यमंत्र्याच्या संपर्कात आहेत. त्यामुळे तेही भाजपच्या गोटात दाखल होणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS