आघाडीला धक्का देणाय्रा युतीलाच बसणार मोठा फटका ?, राष्ट्रवादीच्या नेत्यानं केला मोठा गौप्यस्फोट!

आघाडीला धक्का देणाय्रा युतीलाच बसणार मोठा फटका ?, राष्ट्रवादीच्या नेत्यानं केला मोठा गौप्यस्फोट!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला धक्का देणाय्रा शिवसेना-भाजप युतीलाच मोठा धक्का बसणार असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसच्या नेत्यानं केला आहे. युतीचे बडे नेते तिकिटासाठी काँग्रेसच्या संपर्कात असून ते लवकरच काँग्रेस-राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. कोण कोण नेते संपर्कात आहेत हे आम्ही तुम्हाला लवकरच सांगू आणि त्यांची नावंही जाहीर करू, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच अजुनही काही नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. परंतु अशातच भाजप-शिवसेनेतीलच काही नेते आता काँग्रेस-राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं आहे. युतीचे बडे नेते तिकीटासाठी काँग्रेसच्या संपर्कात असून ते लवकरच काँग्रेस-राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे हे नेते कोण आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

COMMENTS