खातेवाटपाबाबत महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक, अजित पवारांना देणार हे खातं?

खातेवाटपाबाबत महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक, अजित पवारांना देणार हे खातं?

मुंबई – महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होऊन 13 दिवस झाले आहेत. परंतु अद्यापही खातेवाटप झालं नाही. त्यामुळे खातेवाटप कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. आज महाविकासआघाडीच्या नेत्यांनी खातेवाटपावर चर्चेसाठी बैठकीचं आयोजन केलं आहे.  संध्याकाळपर्यंत चर्चा संपून खातेवाटप निश्चित होईल, असंही महाविकासआघाडीच्या काही नेत्यांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी 2 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनाही अजून खातेवाटप झाले नसल्यामुळे हे खातेवाटप कधी होईल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. खातेवाटपच झाले नसल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यताही अद्याप धुसरच आहे. याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदानंतरचं सर्वात महत्त्वाचं खातं म्हणजेच गृह खातं दिलं जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

दरम्यान महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये तीन खात्यावरुन अद्यापही निर्णय होत नाही. यात गृह, नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याचा समावेश आहे. या खातेवाटपाचा तिढा मुख्यत्वे शिवसेना आणि राष्ट्रवादीतच असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे हा तिढा आज सुटणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS