‘महाशिवआघाडी’ नको तर हे नाव द्या, काँग्रेसचा प्रस्ताव!

‘महाशिवआघाडी’ नको तर हे नाव द्या, काँग्रेसचा प्रस्ताव!

मुंबई – राज्यात लवकरच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार उदयास येणार असल्याचं दिसत आहे. कारण सरकार स्थापनेसाठी या तिन्ही पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. हे तीन पक्ष एकत्रित येऊन सरकार स्थापन करणार असल्यामुळे माध्यमांकडून या आघाडीला ‘महासेनाआघाडी’ किंवा ‘महाशिवआघाडी’ असे नाव देण्यात आले आहे. परंतु या नावावर काँग्रेसनं आक्षेप घेतला असल्याची माहिती आहे. त्याऐवजी ‘महाविकासआघाडी’ असं नाव देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने ठेवल्याची माहिती आहे. त्यामुळे ‘महाविकासआघाडी’ असं नाव ठेवलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान या दोन्ही नावांमधून फक्त शिवसेना या एकाच पक्षाचं नाव अधोरेखित होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या नावाचा यामध्ये उल्लेख होत नाही. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नावांचा समावेश करण्याचा आग्रह धरण्याऐवजी कोणाचंच नाव समाविष्ट करु नये. त्याऐवजी ‘महाविकासआघाडी’ असं नाव ठेवण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिला असल्याची माहिती आहे. त्यामुळे यावर आता राष्ट्रवादी आणि शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS