सर्वात कमी जागा मिळूनही जेडीएसचा मुख्यमंत्री होणार ?

सर्वात कमी जागा मिळूनही जेडीएसचा मुख्यमंत्री होणार ?

बंगळुरुकर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला येणार असल्याची शक्यात वर्तवली जात आहे. या निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळाल्या आहेत तर त्यानंतर काँग्रेस आणि तिस-या नंबरवर जनता दल सेक्युलर अर्थात जेडीएस आहे. परंतु तिस-या नंबरवर असूनही जेडीएस पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसने तिसऱ्या क्रमांकावरील जेडीएसला पाठिंबा जाहीर केला आहे. इतकंच नाही तर काँग्रेसने थेट जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असल्याची सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान भाजप सर्वाधिक 104 जागांसह पहिल्या क्रमांकावर,  काँग्रेस 76 जागांसह दुसऱ्या तर जेडीएस 39 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच ही आघाडी असल्यामुळे अंतिम निकाल अजून येणे बाकी आहेत. त्यामुळे यामध्ये आणखी बदल होऊ शकतात. त्यामुळे अंतिम निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान भाजपने सुरुवातीला बहुमताचा 112 चा आकडा पार केला होता. त्यामुळे भाजपने सेलिब्रेशन आणि जल्लोषाला सुरुवात केली होती.
येडीयुरप्पा हे मुख्यमंत्री असतील, असं भाजपने आधीच जाहीर केलं होतं. मात्र दुपारी अडीचनंतर चित्र बदलल्यामुळे भाजपने सेलिब्रेशन आवरतं घेतलं असल्याचं दिसून येत आहे. यावरुन कर्नाटकाची निवडणूक चुरशीची झाली असल्याची दिसून येत असून मुख्यमंत्री कोणाचा होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS